कणकवलीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
कणकवली : प्रतिनिधी
ठाकरे शिवसेना नेते , माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेलीआळी मित्र मंडळ व परशुराम उपरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग व ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवार १४ एप्रिल रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कणकवलीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता कणकवलीत शुभेच्छा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.
माजी आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार १४ २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत नेहरू नगर, कणकवली येथील भगवती हॉल येथे मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिरात अँजिओप्लास्टी, कर्करोग, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, मूत्रविकार, प्रोस्टेट, मोतीबिंदू, हर्निया, थायरॉईड, महिलांचे गर्भाशयाचे आजार, मणक्याच्या समस्या आदी विविध आजारांवर तपासणी व सल्ला दिला जाणार आहे. काही शस्त्रक्रिया मोफत तर काही अल्पदरात करण्यात येणार आहे. या उपक्रमांत जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, आॅथोर्पेडिक व नेत्रतज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे









