कणकवली : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर एसटी बस व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात सुदैवाने दुचाकीस्वार बचावला. कृष्णा साटम (रा. निरोम ) असे अपघातग्रस्ताचे नाव आहे. हा अपघात वागदे पेट्रोल पंपा समोरील सर्कल पॉईंटवर गुरुवारी दुपारी झाला.
रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीस्वाराला मालवणहून कणकवलीच्या दिशेने येणाºया एसटी बसने धडक दिली. यात कृष्णा साटम हा तरुण गंभीर जखमी झाला असून तो होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. त्याला उपचारासाठी तत्काळ कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, प्रणाली जाधव, बी. एस. डी. साबळे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.









