नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी मोफत अर्ज व मार्गदर्शन
कागदपत्रांच्या अडचणी दूर करण्यासाठी युवा मित्र कक्ष कार्यरत
कुडाळ : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कागदपत्रांची कमतरता अडथळा ठरू नये, या उदात्त हेतूने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ शाखेतर्फे ‘तुमचे दाखले… आमची जबाबदारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. युवा मित्र कक्ष आणि श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहीती मंदार शिरसाट यांनी दिली
उपलब्ध सेवा : विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध दाखल्यांचे अर्ज मोफत उपलब्ध करून दिले जातील. दाखल्यांसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबाबत तज्ज्ञांकडून पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन मिळेल.अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी कुडाळ येथील ठाकरे शिवसेना शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४०५८१२१२१ किंवा ९९२३७४२१२१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही मंदार शिरसाट यांनी सांगितले.









