ठळक घडामोडी

कणकवलीत गड नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू!

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली कामाची पाहणी!

कणकवली : प्रतिनिधी
    कणकवली शहरातील नाथ पै नगर व बिजलीनगर प्रभाग नजिकच्या श्रीधर नाईक उद्यान परिसरातील गड नदीपात्रात गाळ काढण्याच्या काम सुरु आहे. या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक संकेत नाईक व जयेश धुमाळे उपस्थित होते.
     नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम हे अत्यंत दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा सूचना सुशांत नाईक यांनी दिल्या. यावेळी नाम फाउंडेशनचे दिग्विजय पाटील आणि लघू पाटबंधारे विभागाचे उपविभागिय अभियंता विकास परब उपस्थित होते.
     पाहणी, दरम्यान सुशांत नाईक यांनी मराठा मंडळ आणि कनकनगर येथील केटी बंधा-यातील गाळ काढण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत अधिकाºयांनी सांगितले की, मराठा मंडळ येथील केटी बंधा-यातील गाळ काढण्यासाठी यंदा आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच, कनकनगर येथील केटी बंधा-याचा गाळ पुढील वर्षी काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शहरातील केटी बंधा-यांना लावलेल्या लोखंडी प्लेट्समधून पाण्याची मोठी गळती होत आहे. त्यामुळे पाणीसाठा टिकून राहत नाही. ही गळती थांबवण्यासाठी जुन्या प्लेट्स बदलून त्या ठिकाणी नवीन प्लेट्स बसवण्यात याव्यात, अशी सूचना श्री. नाईक यांनी अधिका-यांना केली.

error: Content is protected !!