ठळक घडामोडी

कुडाळ तालुक्यातील ग्रा.पं. पोट निवडणुकीचा निकाल जाहीर!

कालेली ग्रा.पं. थेट सरपंच पदी समृद्धी कालेलकर विजयी!

चेंदवणमध्ये, रानबांबुळी व गावराईतील सदस्य पदाचा निकाल

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी 58.90 टक्के एवढे मतदान झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
     थेट सरपंच पदाची निवडणूक – कालेली ग्रा.पं. समृध्दी सुधाकर कालेलकर (विजयी) – 347 मते तर रसिका किशोर जाधव 222 मते. सदस्य पदाची निवडणूक – चेंदवण ग्रा.पं. प्रभाग क्रमांक 2 – अनुष्का बाबू ठुंबरे (विजयी) – 141 मते तर सान्वी सागर चव्हाण 119 मते. प्रभाग क्रमांक 3 – उमेश मधुकर नाईक (विजयी) 126 मते, तर नितीन दिनकर भरडकर 118 मते व हेमंत अर्जुन जुवेकर 15 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 3 – शिंदे सायली धोंडी नाईक (विजयी) 171 मते तर स्मिता समीर मसुरकर 90 मते.
    रानबांबुळी ग्रा.पं. प्रभाग क्रमांक 2 – प्रसाद मधुकर गावडे (विजयी)168 मते तर सत्यवान शंकर बांबुळकर 133 मते. गावराई ग्रा.पं. प्रभाग क्रमांक 2 – अक्षता अमित राणे (विजयी) 98 मते, विनोद लक्ष्मण राऊत 69 मते प्राप्त झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील व निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

error: Content is protected !!