निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
कसाल : प्रतिनिधी
कसाल शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी अवधूत मालणकर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीनंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मते मिळवत विजयी कामगिरी केली होती.
अवधूत मालणकर हे अनेक वर्षांपासून शिक्षण संस्थेच्या कार्यात सक्रिय असून संस्थेच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना श्री. मालणकर म्हणाले, “शाळेची जडणघडण प्रामाणिकपणे आणि सर्वांच्या सहकार्याने करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वांना सोबत घेऊन शिक्षण संस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू.”
त्यांच्या निवडीबद्दल विविध मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.









