सभापती मिलिंद नाईक यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पंचायत समितीची आमसभा सोमवार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे पार पडणार आहे, अशी माहिती सभापती मिलिंद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पंचायत समितीच्या सभापती दालनात गुरुवारी ही पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जि. प.चे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, पं. स. सदस्य निखिल कांदळगावकर आणि उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड आदी उपस्थित होते.
सभापती श्री. नाईक म्हणाले की, अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे गेल्या सहा वर्षांपासून ही सभा होऊ शकली नव्हती. यापूर्वीची आमसभा २ मार्च २०१९ रोजी झाली होती. आता येत्या २७ एप्रिल रोजी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आमसभा होत असून, तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होत आहे. नागरिकांनी आपल्या समस्यांबाबतची लेखी निवेदने दि. २६ एप्रिलपर्यंत कुडाळ पंचायत समिती कार्यालयाकडे जमा करावीत. तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी आपल्या भागातील समस्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही सभापती मिलिंद नाईक यांनी केले आहे.









