ठळक घडामोडी

कणकवलीत परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

उपस्थित मान्यवरांचा उपरकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली : आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करताना माजी आम. वैभव नाईक. सोबत जीजी उपरकर,संदेश पारकर, रुपेश नार्वेकर,लुकेश कांबळे पदाधिकारी व कार्यकर्ते (छाया : अनिकेत उचले)

कणकवली : प्रतिनिधी
  महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आम.परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कणकवली  भगवती हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी  व उपचार शिबीर घेण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उदघाटन माजी आम. वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जीजी उपरकर यांना शाल व पुष्पहार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विविध आजारांवर तपासणी करण्यासाठी  बी. के.एल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण ची वैद्यकीय टीम उपस्थित होती.
        यावेळी वैभव नाईक म्हणाले, जीजी उपरकर यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता शिवसेना पक्षाशी ते निष्ठावंत राहिले आहेत. स्वतःला काहीतरी मिळाले पाहिजे असा विचार त्यांनी कधीही  केला नाही पक्ष वाढीसाठी त्यांची सातत्याने धडपड सुरु असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा एकदा शिवसेना वाढविण्याचे काम करूया असे सांगत उपरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
       संदेश पारकर म्हणाले, परशुराम उपरकर हे लढाऊ व्यक्तिमत्व असून  वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी  उपक्रम ते  राबवितात. जिल्ह्यातील प्रश्नांवर आवाज उठवून अन्यायाविरुद्ध लढण्याचे काम ते करीत आहेत. त्यांचे हे कार्य असेच अविरतपणे सुरु रहावे व त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली. 
        परशुराम उपरकर म्हणाले,सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना लोकांना जे काही देणे शक्य आहे ते देत राहण्याचा प्रयत्न मी करीत आहे. शिवसैनिकांना साथ देऊन शिवसेना संघटना पूर्ववत करण्याचा वाढदिवसानिमीत्त मी संकल्प करत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धवजी ठाकरेंना अभिप्रेत असलेली संघटना पुन्हा एकदा उभी करूया असे त्यांनी सांगितले.
       नीलम पालव यांनी जीजी उपरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प. पू. भालचंद्र महाराज व श्री देव स्वयंभू चरणी प्रार्थना केली. 
         यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर,लुकेश कांबळे,संतोष सावंत,चंद्रशेखर उपरकर,विलास गुडेकर, किरण हुन्नरे,समीर परब,जगन्नाथ आजगावकर, राजू कोरगावकर,संजय बेलवलकर,प्रवीण कोरगावकर,पप्पू कोरगावकर,संदीप म्हाडगूत, शैलेश नेरकर, प्रमोद सावंत,उमेश हजारे,पुरुषोत्तम तारी, निलेश चव्हाण, डेरवण रुग्णालयाचे डॉ. अमित वालावलकर, डॉ. क्रिशांत दिवाटे, डॉ. पूजा गीते,डॉ. आकाश राऊळ,अमित वैद्य आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!