ठळक घडामोडी

कणकवलीत कातकरी समाजातील मुलावर कोयत्याने हल्ला!

पटकीदेवी परिसरातील घटना

कणकवली : प्रतिनिधी
    कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर परिसरात एका कातकरी समाजातील अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात  मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
     याबाबत वृत्त असे की, बाजारपेठेतून पटकीदेवी मंदिर मार्गे बांधकरवाडीच्या दिशेने जात असताना मुलाचा आणि त्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांमध्ये वाद झाला. यात मुलाच्या हातात असलेला कोयता घेऊन त्याच्यावर डोक्यावर तीन ते चार ठिकाणी सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. स्थानिकांना त्याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, या घटनेनंतर समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!