ठळक घडामोडी

कुडाळ येथे आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत!

कुडाळ : प्रतिनिधी
       विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, गुरूवारी सायंकाळी कुडाळ तालुका भाजपच्या वतीने त्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला. कुडाळ येथील हॉटेल लाईम लाईटच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
      यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, दादा बेळणेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, उपसभापती सीताराम तेली,माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर, राजू राऊळ, कुडाळ न. प. चे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, भाई सावंत, संध्या तेरसे, अक्षता खटावकर, आफरीन करोल, ज्योती जळवी, कल्पिता मुंज, अर्चना घावनळकर, नीरजा प्रमोद जठार, अदिती सावंत, विशाखा कुलकर्णी, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
      यावेळी बोलताना आमदार जठार म्हणाले, भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ती राष्ट्राची पूजा आहे. कार्यकर्त्यांनी आता जुना-नवा असा वाद बाजूला ठेवून आपली मने विशाल करणे गरजेचे आहे. पक्ष कार्यालये मोठी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी मने मोठी करावीत. आग विझवण्याचे काम करा, लावण्याचे नाही. २०४७ पर्यंत हा भारत देश पुन्हा एकदा अखंड देश होईल, असा मला ठाम विश्वास आहे, असे ते म्हणाले.
      यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जठार यांना मिळालेली संधी हा कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा विजय आहे. जिल्ह्याला मिळालेल्या या खंबीर नेतृत्वाने आता कुडाळचे पालकत्व स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
      

error: Content is protected !!