इंधनासाठी वाहनधारकांची धावपळ; पुरवठ्याची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळमधील बहुतांशी पेट्रोलपंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने आज सोमवारी सकाळपासून अनेक पेट्रोलपंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ अशा सुचनेच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पेट्रोल व डिझेल तुटवड्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय निर्माण झाली. वाहनधारक पेट्रोल व डिझेल साठी गाड्या घेऊन एका पंपावरून दुस-या पंपावर अशी धावाधाव करीत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. मात्र पेट्रोल – डिझेल तुडवड्यामुळे अनेक वाहनधारकांना मोठा फटका बसला. त्यामुळे पुरेशा प्रमाणात इंधन साठा उपलब्ध करून देण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.









