अभिषेक, महापूजा ते पालखी सोहळा; दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
किर्तन, भजन आणि दशावतार नाटकाने सोहळ्याची रंगत वाढणार
कुडाळ : प्रतिनिधी
गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. 19 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
19 रोजी सकाळी 7 वाजता देव आणणे, 7.30 वाजता दोन्ही मंदिरात अभिषेक, 9 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता आरती, महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता किर्तनकार-भाऊ नाईक यांचे किर्तन, 7 वाजता सुहासिनीच्या हस्ते देवाला औक्षण, महाआरती रात्री 8 वाजता ग्रामस्थांची भजने, 8.30 वाजता सदगुरू वारकरी दिंडी मंडळ (कुडाळ) चे भजन,10.30 वाजता श्रींचा पालखी सोहळा,12 वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन सत्पुरुष व भराडी देवस्थान समितीने केले आहे.









