ठळक घडामोडी

तिलारी घाटात मालवाहू ट्रकला अपघात; मोठी दुर्घटना टळली!

संरक्षक कठड्याला धडकल्याने ट्रक दरीत कोसळण्यापासून बचावला

तिलारी घाटातील वाहतूक विस्कळीत; वाहनांच्या लांबच लांब रांगा

दोडामार्ग : प्रतिनिधी
       तिलारी घाटात शनिवारी सकाळी मालवाहू ट्रकला अपघात झाला. धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने ट्रक संरक्षक कठड्याला धडकला. सुदैवाने ट्रक दरीत कोसळण्यापासून बालंबाल बचावला. अपघातानंतर ट्रक रस्त्यात आडवा झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून दुचाकी वाहनांना कसाबसा मार्ग काढत प्रवास करावा लागत होता. माहिती मिळताच स्थानिक नागरिक व वाहतूक विभाग घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

error: Content is protected !!