मालवण – कसाल मार्गावर भीषण अपघात; एक जखमी
मालवण पोलिसांची घटनास्थळी धाव
मालवण : महेश कदम
मालवण – कसाल मार्गावर चौके धनगराचा गोठा येथे आज शुक्रवारी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास डंपर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील एका युवकाचे दुर्देवी निधन झाले. त्यासोबतच असलेला सहकारी जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मालवणहून चौकेच्या दिशेने येणाऱ्या डंपरला चौके धनगराचा गोठा येथे दुचाकीने ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरच्या टायरच्या वरच्या भागाला धडक दिली. हि धडक एवढी तीव्र होती की दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात एकाचा डंपरच्या चाका खाली गेल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सहकारी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी चौके रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहीती मिळताच चौक येथील राजा गावडे, संतोष गावडे, बीजी गावडे, बंड्या गावडे, अजित गावडे, साई गावडे, सचिन आंबेरकर यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. मालवण पोलीसांनी घटनास्थळी येत पंचनामा करीत पुढील कार्यवाही सुरु केली. पोलीस पाटील रोहन चौकेकर यांनी अपघाताची खबर दिली. घटनास्थळी नागरीकांची गर्दी झाली असून, वाहतूकही काहीशी विस्कळीत झाली होती.









