ठळक घडामोडी

सबज्युनिअर राज्य बास्केटबॉलसाठी सिंधुदुर्ग संघ निवड चाचणी १६ एप्रिलला!

मालवणात होणार ट्रायल; इच्छुक खेळाडूंना सहभागाचे आवाहन

मालवण : प्रतिनिधी
      महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित ५१ वी सबज्युनिअर गटातील राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा दिनांक ३ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत सातारा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनतर्फे जिल्हा स्तरावरील निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
     ही निवड चाचणी गुरुवार, दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता डॉ. कुडाळकर हायस्कूल, मालवण येथील बास्केटबॉल मैदानावर पार पडणार आहे. इच्छुक खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
     स्पर्धेसाठी पात्रता निकषांनुसार खेळाडूंचा जन्म ०१ जानेवारी २०१३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेदरम्यान खेळाडूंनी जन्म प्रमाणपत्र व आधारकार्ड ची मुळप्रत व ईतर कागदपत्रे सोबत आणावीत.
     अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय मधुकर शिंदे (मो. ९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!