मालवण : प्रतिनिधी
मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९४.३३ टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ५३ विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के व कला शाखेचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखेतून प्रथम – रिद्धी रवींद्र केळूसकर (४८७ गुण), द्वितीय – संजीवनी लक्ष्मण केळूसकर (४५१ गुण), तृतीय – हेमांगी उमेश चव्हाण (४३०) तर कला शाखेतून प्रथम – तन्वी गणेश जाधव (४३८ गुण), द्वितीय – मिनिषा मिलिंद धुरी (४११ गुण), तृतीय – निशांत नितीन शिरोडकर (३९९ गुण) यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शालेय समिती अध्यक्ष विजय केनवडेकर आणि संस्था पदाधिकारी तसेच स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सलंग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. राबते व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.









