ठळक घडामोडी

फोंडाघाट येथे रविवारी आद्य गौड ब्राह्मण समाजाचा महिला स्नेहमेळावा!

पूर्णानंद महिला मंच व महिला विभागाचे संयुक्त आयोजन

समाजातील महिलांना सहभागाचे आवाहन

कणकवली : प्रतिनिधी
     पूर्णानंद महिला मंच कणकवली आणि कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडाघाट – पिंपळवाडी येथे रविवार १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ७ वा जिल्हास्तरीय महिला स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास अपूर्वा सामंत, शिल्पा सामंत, वर्षा परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, दिवसभर विविध कार्यक्रमांनी मेळावा रंगणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता नावनोंदणी व लकी ड्रॉ कूपन संकलनाने होणार असून, ९.३० वाजता अल्पोपहारानंतर १० वाजता प्रास्ताविक, प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत, सत्कार, मनोगते व मार्गदर्शन होईल.
दुपारच्या सत्रात स्त्रीकेंद्रित सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक प्रहसने सादर केली जाणार असून, त्यानंतर मनोरंजनात्मक बैठे खेळ, मैदानी खेळ व बौद्धिक स्पर्धांचा समावेश आहे. सायंकाळी ४.३० वाजता लकी ड्रॉ सोडत व बक्षीस वितरण होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. या मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी प्रतिभा अवसरे असून समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष अरुणा सामंत व तालुकाध्यक्ष सुलक्षा सामंत यांनी केले आहे.

error: Content is protected !!