ठळक घडामोडी

कुडाळ मधील रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद; ३३ दात्यांचा सहभाग!

सुशील चिंदरकर मित्रमंडळाचे आयोजन; माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरातून जोपासली सामाजिक बांधिलकी

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर निरिक्षक सुशिल चिंदरकर यांच्या मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 33 रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.
     सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. विविध रक्तपेढ्यांकडून रक्तदानासाठी आवाहनही केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन शिवसैनिक सुशिल चिंदरकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शादाब शहा, स्वप्निल शिंदे, सागर देवार्डेकर, सागर चव्हाण, किरण तळवडेकर, सबा शहा, अल्तमश शहा, नितीन सावंत, हाशिम मुजावर, चेतना खानोलकर,  बाळा पावसकर, लक्ष्मण काणसे,  नंददीपक पालव, सानिका चिंदरकर, संजना कुंभार, संजय कुंभार, इसाक मुजावर, सौरभ वराडकर, व्यंकटेश साळगावकर, संतोष घोगळे, प्रसाद शेलटे, दिनार शिरसाट, सुमीत म्हेतर, विनायक मेस्त्री, अमर कुंभार, रणजित कुंभार, शुभम पावसकर, धीरेंद्र चव्हाण, अभिषेक कामत, ओंकार पालयेकर, अक्षय वारंग, वैभवी जांभवडेकर, मंदा नाईक या एकूण 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
     या शिबिराला माजी आमदार वैभव नाईक, मुंबईचे माजी नगरसेवक आणि ईशान्य मुंबई विभागप्रमुख सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, कणकवलीचे नगरसेवक संकेत नाईक, माजी जि.प.सदस्य संजय भोगटे, मंदार शिरसाट, कृष्णा धुरी, राजेश म्हाडेश्वर, राजन नाईक, चेतन धुरी, नितीन सावंत, योगेश धुरी, सचिन काळप, राजू गवंडे, कृष्णा तेली, दीपक सावंत, शेखर कुंभार, कुडाळ पोस्ट कार्यालयातील अधिकारी नितीन नेमळेकर, सचिन नेमळेकर, भगवान कुंभार, सुरेश कुंभार, किरण तळवडेकर, महादेव कुंभार, पप्पू म्हाडेश्वर, आनंद परब, गोट्या कोरगावकर, उमेश परब, दीपक भोगटे, गुरू गडकर, अज्जु शहा, मक्सूद शेख, व्यापारी संघटना माजी अध्यक्ष श्रीराम शिरसाट, नाना कुंभार, बॅ.नाथ पै प्रशालेचे मुख्याध्यापक राठोड सर, पप्पू कुंभार, गोट्या कुंभार, रमेश हरमलकर, संजय परब यांनी शिबिराच्या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी नितीन सावंत, ओंकार पालयेकर, बंटी कामत, स्वप्निल शिंदे, गोट्या चव्हाण, दिनार शिरसाट, कृष्णा तेली, दीपक सावंत, मेहताब शहा, बाळा पावसकर यांनी विशेष मेहनत घेतली. सुशिल चिंदरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधीलकी जोपासली.

error: Content is protected !!