ठळक घडामोडी

वारंगाची तुळसुलीतील श्री कुलदेवता मंदिरात ९ मे रोजी धार्मिक कार्यक्रम!

वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

अभिषेक, भजने, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ते दशावतारी नाटक

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली – कालेलकरवाडी येथील श्री कुलदेवता मंदिर येथे शनिवार, दि. ०९ मे २०२६ रोजी वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
    यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री गणेश पूजन व अभिषेक तर सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता आरती व नैवेद्य होणार असून दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्थानिकांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ ते १० या वेळेत लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. रात्री १० वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, वालावल यांचा ‘देवी हनुमंतेश्वरी’ हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कुलदेवता सेवा मंडळ कालेलकरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!