ठळक घडामोडी

आ. निलेश राणेंच्या हस्ते कुडाळ तालुक्यात बुधवारी ९ विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन!

विविध विकासकामांसाठी आमदार राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर : सभापती मिलिंद नाईक

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यात एकाच दिवशी विविध ९ विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहेत. विविध कामांचा यात समावेश आहे. या कामांसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे, अशी माहीती कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांनी दिली.
     दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता नेरुर कलेश्वर मंदिर येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता  वालावल तलाव सुशोभीकरण करणे कामाचे भूमिपूजन, ११.३० वाजता वालावल येथे नवीन ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण, दुपारी १२.३० वाजता  – पाट तलाव सुशोभीकरण करणे कामाचे भूमिपूजन करणे, ३ वाजता   निवजे येथे निवजे-आंबेरी रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण करणे, सायं. ४ वाजता  अणाव पिटढवळ नदीवर जेटी बांधणे कामाचे भूमिपूजन, ५ वाजता  कुंदे येथे कसाल-कुंदे-आंब्रड मार्गावरील पुलाचे लोकार्पण, ५.३० वाजता पोखरण सांद्रेवाडी बंधारा बांधणे भूमिपूजन करणे, ६ वाजता आंब्रड येथे आंब्रड परबवाडी प्राथ. शाळा सभामंडप लोकार्पण करणे आदी विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आ. राणेंच्या हस्ते होणार आहे. यावेळी ग्रामस्थ तसेच पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सभापती श्री.नाईक यांनी केले आहे.

error: Content is protected !!