पावशी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो संरक्षक रोलिंगवर आदळला
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील श्री मार्कंडेय मंदिरासमोर गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने मासे वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा आज रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी रोलिंगला जोरदार धडक दिली. या धडकेत रोलिंग तुटून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावरील संरक्षक रोलिंगचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.









