ठळक घडामोडी

संघर्षातून उभे राहिलेले झुंजार नेतृत्व – रुपेश पावसकर

रूपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

धार्मिक, क्रिकेट स्पर्धा, ते नाट्यप्रयोग; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. २० एप्रिल रोजी विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची उत्साहपूर्ण मांदियाळी आयोजित करण्यात आली आहे.
      संघर्ष ज्यांच्या वाट्याला आला, पण त्यावर मात करून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे, नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघात विजयाचा इतिहास रचत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आज जिल्हाभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे झुंजार व्यक्तिमत्व म्हणजे रुपेश पावसकर!. आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. अशा जि.प.सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित प.पूज्य राऊळ यांच्या पिंगुळी येथील मठात सकाळी लघुरुद्र त्यानंतर नेरूर चव्हाटा मारुती मंदिर येथे लघुरुद्र नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सरंबळ जाधववाडी येथे अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा “लेक माझी तुळजाभवानी ” हा नाट्यप्रयोग नेरूर देऊळवाडा पंचायत समिती सदस्या सौ.दीप्ती प्रदीप उर्फ गोटू नाईक यांनी सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी पुरस्कृत केला आहे. त्याचप्रमाणे नेरूर चव्हाटा येथे रणझुंझार मित्रमंडळ पुरस्कृत “कृष्ण हनुमान युद्ध” हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी रसिक श्रोते, हितचिंतक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रुपेश पावसकर मित्रमंडळ, रणझुंझार मित्रमंडळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!