ठळक घडामोडी

कुडाळ पंचायत समितीची आमसभा !

आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

नागरीकांच्या निवेदनांसह विभाग निहाय आढावा

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ पंचायत समितीची आमसभा आज सोमवारी येथील महालक्ष्मी हॉलच्या सभागृहात आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेत विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला जात असून तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, विकासकामे व योजनांची अंमलबजावणी यावर चर्चा करीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
      या आमसभेला सह अध्यक्ष तथा सभापती मिलिंद नाईक, जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, माजी आमदार शंकर कांबळी, दत्ता सामंत, सचिव तथा गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील, जि.प.अध्यक्ष काका कुडाळकर व संजय पडते, जि.प.सदस्य दिपलक्ष्मी पडते, दिपक नारकर, रूपेश कानडे आदींसह जि.प. व पं.स. सदस्य, तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, खातेप्रमुख अधिकारी, व नागरिक उपस्थित होते.

   सभेदरम्यान उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. या आमसभेत विविध विभागनिहाय कामकाजाचा सविस्तर आढावा घेत, प्रलंबित प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांच्या सूचनांनुसार ठोस व परिणामकारक पावले उचलली जातील, असे आश्वासन देण्यात आले. कुडाळ तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आमसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!