मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व कृषी विकासाचा गावात अभ्यास; ग्रामपंचायतीला भेट देत कार्यक्रमाची माहिती

कुडाळ : प्रतिनिधी
उद्यानविद्यालय महाविद्यालय, मुळदेच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आंदुर्ले गावात दाखल झाल्या असून पुढील सहा महिने त्या गावात वास्तव्यास राहून शेती व ग्रामीण जीवनाचा अभ्यास करणार आहेत.
विद्यार्थिनींनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत सरपंच अक्षय तेंडोलकर व उपसरपंच अनिल भगत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे महत्त्व, शेतकऱ्यांना होणारे फायदे तसेच आधुनिक शेतीविषयक माहिती गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंच तेंडोलकर यांना सुपूर्द करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कुमारी समृद्धी कुंभार, धनश्री कुंभार, अनघा परब, संजीवनी झेंडे, आयशा, इशिका, अंजना, प्रिती मालणकर आणि अभिज्ञा हरमलकर या विद्यार्थिनींचा सहभाग असून त्या पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत गावातील शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच कृषी विकासाच्या विविध बाबींचा अभ्यास करणार आहेत.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक संरक्षण, सेंद्रिय शेती व कृषीविषयक नवीन माहितीचा लाभ होणार असल्याचे विद्यार्थिनींनी यावेळी सांगितले.









