ठळक घडामोडी

देवळी समाजाचा १० मे रोजी कुडाळात जिल्हास्तरीय मेळावा!

वधू-वर सूचक मेळावा; लोकप्रतिनिधी, गुणवंतांसह मान्यवरांचा सन्मान

जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची माहीती; विजय तुळसकरच्या कला सादरीकरणाचे विशेष आकर्षण

कुडाळ : प्रतिनिधी
      देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने रविवार दि. 10 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल च्या सभागृहात देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहीती देवळी समाज हितवर्धक मंडळ जिल्हाध्यक्ष राजन शिवराम नाईक यांनी आज कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
       या मेळाव्यात जिल्हाभरातील देवळी समाजातील दशावतारी नाट्य मंडळे, क्रिकेट मंडळे, विविध क्षेत्रातील कलाकार, 12 वी तील गुणवंत विद्यार्थी, जि.प. व पं.स. सदस्य, नगरसेवक, डाॅक्टर्स यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहेत. या मेळाव्यात आपल्या कलेने अल्पावधीतच आपला नावलौकिक प्राप्त केलेल्या तुळस-मातोंड येथील विद्यार्थी विजय तुळसकर याचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, त्याच्या कला सादरीकरणाचाही कार्यक्रम होणार आहे. वधू-वर सूचक मेळावाही आयोजित करण्यात आला असून, वधू-वरांनी बायोडाटा घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या मेळाव्याला अनेक मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील देवळी समाज ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री.नाईक यांनी यावेळी केले.
     या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा सचिव विष्णू चौकेकर, खजिनदार रमेश नरसुले, सदस्य अॅड.अनघा तेंडोलकर, अरविंद तेंडोलकर, भास्कर केरवडेकर, मयूर आरोलकर, नागेश ओरोसकर, अनिल तोंडवळकर व सल्लागार बाळ कनयाळकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!