ठळक घडामोडी

माणगावात टेंब्ये स्वामी महाराज जन्मस्थानी कलशारोहण सोहळा उत्साहात!

श्री प.प. वल्लभानंद सरस्वती यांची उपस्थिती; भाविकांची मोठी गर्दी

कुडाळ : प्रतिनिधी
           अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंब्ये स्वामी महाराज की जय अशा दुमदुमणाऱ्या नामघोषात रविवारी सकाळी पवित्र वातावरणात कलशारोहण सोहळा भक्तिभावाने संपन्न झाला. या सोहळ्याचे विधी श्री प.प. वल्लभानंद सरस्वती (श्री क्षेत्र गाणगापूर) यांच्या हस्ते पार पडले.
        कलशारोहणाच्या प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्रद्धेची प्रचिती दिली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या जन्मस्थानी प्राकारशुद्धी, पीठ देवता पूजन आणि वास्तुतत्त्व हवनाने झाली. त्यानंतर मुख्य कलशारोहण विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
          याप्रसंगी श्री प.प. वल्लभानंद सरस्वती यांच्या पाद्यपूजेचा कार्यक्रम झाला तसेच त्यांच्या आशीर्वचनांनी उपस्थित भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले. बलिदान पूर्णाहुती, अभिषेक यांसह विविध धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी महाप्रसाद नंतर कोकण गंधर्व श्री. राजाराम शेंबेकर (चिपळूण) यांच्या सुश्राव्य गायन सेवेने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. “कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या” या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.सकाळपासूनच जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून सुद्धा आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. या सोहळ्यामुळे माणगाव परिसरात धार्मिक उत्साह आणि श्रद्धेची लहर अनुभवायला मिळाली.

error: Content is protected !!