ठळक घडामोडी

कणकवलीत १२ मे पासून स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला!

खा. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून होणार व्याख्यानमाला

कणकवली : प्रतिनिधी
     माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला यंदा त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा एकदा नव्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. सलग ६ वर्षे यशस्वीपणे पार पडलेल्या या व्याख्यानमालेत देशातील अनेक दिग्गज विचारवंतांनी उपस्थिती लावून कणकवलीकरांना बौद्धिक मेजवानी दिली होती.यंदा ही व्याख्यानमाला १२, १३ आणि १४ मे रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्वामी विवेकानंद सभागृह, प्रहार भवन येथे रंगणार आहे. व्याख्यानमालेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : १२ मे अविनाश धर्माधिकारी -भारताचा भविष्यकाळ आणि आपण सारे, १३ मे उदय निरगुडकर – भारत महासत्ता होताना युवकांची मानसिकता आणि भूमिका, १४ मे सदानंद मोरे – महाराष्ट्र धर्म वाढवावा यावर्षी समारोपाच्या दिवशी एक नवी परंपरा सुरू करण्यात येणार असून सिंधुगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पहिला पुरस्कार डॉ. प्रसाद देवधर यांच्या भगीरथ प्रतिष्ठानला जाहीर करण्यात आला आहे.तसेच १४ मे रोजी सायंकाळी ४.३० ते ५.४५ या वेळेत उदय निरगुडकर यांची धुरंधर या विषयावर विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
या व्याख्यानमालेत यापूर्वी मधुकर भावे, कुमार केतकर, विजय कुवळेकर, निळू दामले, लक्ष्मण माने, अच्युत गोडबोले, नरेंद्र जाधव, विश्वास पाटील, रामदास फुटाणे, जयराज साळगावकर यांसारख्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे या उपक्रमात काही काळ खंड पडला होता. या तीनही दिवसांत खा. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संवाद परिवार आणि विवेक विचार मंच या दोन संस्थांच्या वतीने या ज्ञानयज्ञात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.

error: Content is protected !!