ठळक घडामोडी

कुडाळ तहसील कार्यालयाशेजारील मैदानाची नगरपंचायतीकडून स्वच्छता!

दारूच्या बाटल्या व काचा हटवल्या; शासकीय क्रिडा मैदान परिसरात स्वच्छता मोहीम

न.पं. गटनेते विलास कुडाळकर यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तहसील कार्यालय नजिकच्या शासकीय क्रिडा मैदान परिसरातील दारूच्या बाटल्यांचा खच उचलून परिसरातील स्वच्छता कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती न.पं.तील गटनेता विलास कुडाळकर यांनी दिली आहे.
     कुडाळ तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय मैदानामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच तसेच काचांचा खच मोठ्या प्रमाणावर असल्याचे उबाठा शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सांगितले होते आणि या मैदानाची स्वच्छता करण्यासाठी उपक्रम हाती घेणार असे जाहीर केले होते. ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर मंगळवारी कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यां मार्फत मैदानावरील दारूच्या बाटल्या व काचा तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला. याबाबत स्वच्छता विभागाला तशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्यात आला असे गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले.
     माझा प्रभाव माझी जबाबदारी गेली कुठे?
    याबाबत गटनेता विलास कुडाळकर यांनी सांगितले की मैदानावर असलेल्या दारूच्या बाटल्या व काचा हे योग्य नाही, पण हा प्रभाग नगरसेवक मंदार शिरसाट यांचा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या मैदानाच्या स्वच्छतेकडे तसेच मैदानावर चाललेल्या गैर प्रकाराकडे लक्ष देऊन संबंधित प्रशासनाला तशा सूचना देणे गरजेचे होत्या. त्यांची माझा प्रभाव माझी जबाबदारी गेली कुठे?. स्वच्छता मोहीम राबवण्यापेक्षा आपली जबाबदारी समजून नगरपंचायतीकडून ही स्वच्छता करून घेणे गरजेचे होते. मात्र त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून आपल्या प्रभागात किती अस्वच्छता आहे हे दाखवून दिले आहे, अशी टिका श्री.कुडाळकर यांनी केली.

error: Content is protected !!