ठळक घडामोडी

परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज डबलबारी भजनाचा जंगी सामना!

कणकवलीत रसिक श्रोत्यासाठी एक विशेष सांस्कृतिक पर्वणी

भजनप्रेमी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांच्या वतीने आवाहन

कणकवली : प्रतिनिधी
    उबाठा शिवसेनेचे लढवय्या व झुंजार नेते, माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार १३ एप्रिल रोजी कणकवली शहरातील तेली आळी येथे डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना रात्री ८ वाजता रंगणार असून, रसिक श्रोत्यासाठी एक विशेष सांस्कृतिक पर्वनी ठरणार आहे.
    तेलीआळी मित्रमंडळ व परशुराम उपरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या डबलबारी सामन्यात श्री वडचीदेवी प्रासादीक भजन मंडळ, लिंगडाळ-देवगडचे बुवा संदीप लोके विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे-कुडाळचे बुवा गुंडू सावंत यांच्यात सुरेल मैफल रंगणार आहे.
या सामन्यात लोके बुवा यांना पखवाज साथ योगेश सामंत व तबला साथ संदेश सुतार देणार आहेत. तर सावंत बुवा यांना पखवाज साथ विराज बावकर व तबला साथ संकेत गोसावी यांची लाभणार आहे. भजनप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या डबलबारी भजनाचा आनंद लुटावा. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!