ठळक घडामोडी

कणकवलीत आज बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन!

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा

कणकवली : प्रतिनिधी
     लिंगायत समाज कणकवली तालुका यांच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. १९ एप्रिल २०२६ रोजी श्री प. पू. भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास येथे हा उत्सव भक्ती भावाने साजरा होणार आहे.
      या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवारी सकाळी ८.०० वाजता सामूहिक शिवलिंग पूजा तसेच दुपारी १२.०० वाजता अभिषेक व बसवेश्वर जन्म सोहळा पार पडणार आहे.
तर शनिवारी सायंकाळी  महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये 54 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.तर रात्रौ महिलांचा नृत्य आविष्कार व लहान मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसहित युवा व तरुणांनी सहभाग घेत आपली वेगळी छाप उमटवली. या रंगतदार व बहारदार कार्यक्रम मुळे समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. आज १९ एप्रिल रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमानिमित्त तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी या स्वत सहभागी होऊन आनंद लुटण्याचे आवाहन लिंगायत समाज कणकवली तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!