ठळक घडामोडी

कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९८ टक्के…!

पाट हायस्कूलची दिया सामंत तालुक्यात प्रथम, सुधांशू धुरी द्वितीय तर शिवानी सर्वेकर तृतीय

१९ शाळांचा निकाल १०० टक्के

कुडाळ : प्रतिनिधी
          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. कुडाळ तालुक्याने यंदाही शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत ९८ टक्के निकालाची नोंद केली आहे. तालुक्यातून पाट हायस्कूलची विद्यार्थिनी दिया निलेश सामंत हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवत ९९.८० टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.तालुक्यात द्वितीय सुधांशू महेश धुरी (कुडाळ हायस्कूल)  ९९.६० टक्के तर  तृतीय शिवानी मंगेश सर्वेकर (पाट हायस्कूल)  ९८.२० टक्के हिने पटकविला. कुडाळ तालुक्यातून एकूण १,६०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १,५७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ६४४ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, ५०७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर ३०४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश मिळवले आहे.

​​पाट हायस्कूल निकाल 95.53 टक्के
          एस.एल.देसाई विद्यालय पाट या प्रशालेतून 112 विद्यार्थी परिक्षेला बसले होते, पैकी 107 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 95.53 टक्के एवढा लागला. प्रथम क्रमांक दिया निलेश सामंत 99.80 टक्के, द्वितीय शिवानी मंगेश सर्वेकर 98.20 टक्के, तुतीय शुभंकर संदेश नाईक 95.40 टक्के. या प्रशालेतील 15 विद्यार्थ्यांनी 90 टक्केहून अशिक गुण प्राप्त केले. 
      कुडाळ हायस्कूलचा निकाल 98.55 टक्के
            कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ या प्रशालेतून एकूण 208 एवढे विद्यार्थी परिक्षेला बसले होते. पैकी 205 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 98.55 टक्के लागला. प्रशालेत प्रथम क्रमांक सुधांशू महेश धुरी 99.60 टक्के, द्वितीय समृद्धी विलास सरनाईक, आर्या लक्ष्मण आगलावे व वरदा भाग्यविधाता वारंग 98 टक्के, तृतीय क्रमांक आयुषी सगुण केळूसकर 97 टक्के. या प्रशालेत 14 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्याहून जास्त गुण प्राप्त केले.
      पणदूर हायस्कूचा निकाल 97.60 टक्के
            शिवाजी इंग्लिश स्कूल व गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा या प्रशालेतून दहावी परिक्षेला 125 विद्यार्थी बसले होते, पैकी 122 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 97.60 टक्के एवढा लागला. प्रथम क्रमांक चरण सुभाष साईल 95 टक्के, द्वितीय यश रघुनाथ पालव 93.20 टक्के, तृतीय साक्षी लक्ष्मण सामंत 92.80 टक्के, चौथा क्रमांक दुर्वा जयसिंग घाडी 91.40 टक्के, पाचवा क्रमांक समृद्धी रघुनाथ दळवी 90.60 टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष आपा गावडे, सचिव नागेंद्र परब, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, संस्था पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक एम.जी.कर्पे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
      हिर्लोक हायस्कूलचा निकाल 97.72 टक्के
      शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलया प्रशालेतून दहावी परिक्षेला 44 विद्यार्थी बसले होते, पैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 97.72 टक्के लागला. प्रथम क्रमांक यज्ञेश्री पांडुरंग देसाई 87.60 टक्के, द्वितीय प्राजक्ता गजानन शिर्के 87 टक्के, तृतीय क्रमांक कुवम श्रीराम परब 85.60 टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष उदय सावंत, सेक्रेटरी दिपक नारकर, कार्याध्यक्ष सुर्यकांत नाईक, उपाध्यक्ष गुरुदास कुसगावकर, खजिनदार बाजीराव झेंडे, सह सेक्रेटरी पंढरीनाथ सावंत, सर्व संचालक, पालक संघ, मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेत्‍तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
      भडगांव हायस्कूलचा निकाल 100 टक्के
          सहयाद्री माध्यमिक विद्यालय भडगांव बुद्रुक या प्रशालेतून 21 विद्यार्थी परिक्षेला बसले होते, पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला. प्रशालेत साक्षी गणेश सावंत 85.60 टक्के, तन्वी ज्ञानेश्वर सुतार 84 टक्के व वैष्णवी विठोबा लोट 81.20 टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, सचिव संभाजी वळंजू, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सचिन धुरी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!