ठळक घडामोडी

वसोलीतील श्री रवळनाथ देवाचा सातवा वर्धापन दिन सोमवारी!

विविध धार्मिक कार्यक्रमांसह दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन

मुग्धा नाईक यांचे कीर्तन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
    माणगाव खोऱ्यातील वसोली येथील श्री रवळनाथ देवाचा सातवा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक २५ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी नव्याने बांधण्यात आलेल्या ब्राह्मणी पारावर श्रीदेव ब्राह्मण अभिषेक स्थापना, दुपारी सत्यनारायण पूजा आरती, तीर्थप्रसाद, नैवेद्य, महाप्रसाद, ४ वाजता मुग्धा संतोष नाईक ( झाराप ) हिचे किर्तन, सायंकाळी स्थानिक ग्रामस्थ भजन,तसेच शिवापूर ग्रामस्थांचे भजन,रात्री १० वाजता सिध्देश्वल दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग यांचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख गावकरी जयप्रकाश परब व श्रीकृष्ण परब यांनी केले आहे.

error: Content is protected !!