ठळक घडामोडी

कुडाळात परप्रांतीय कामगार व नगरपंचायत कर्मचाऱ्यांत भर रस्त्यात शाब्दिक चकमक!

रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी दंड भरण्यास नकार; प्रशासनाकडून कारवाईचा इशारा

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी; वाहतूकीलाही अडथळा

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ बसस्थानक समोर रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकल्याने एका परराज्यातील कामगाराला नगरपंचायत प्रशासनाने समज देत, दंड भरण्याची सूचना केली मात्र त्या कामगाराने दंड भरण्यास नकार दिला. त्यानंतर परप्रांतीय कामगार आणि नगरपंचायतीचे कर्मचारी यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.
       बसस्थानक परिसरात सकाळी व सायं. परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने गोळा होतात. आजही केळबाईवाडीकडे जाणा-या रस्त्यालगत अनेक कामगार उपस्थित होते. नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने संबंधित कामगाराला रस्त्यावर न थुंकण्याची सूचना देत दंड भरण्यास सांगितले. मात्र त्याने दंड भरण्यास नकार देत रस्त्यालगत डस्टबिन ठेवण्याची मागणी केली. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. घटनास्थळी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता.

error: Content is protected !!