ठळक घडामोडी

पुतण्याला वाचवताना काकाचा समुद्रात बुडून मृत्यू!

देवबाग समुद्रातील दुर्दैवी घटना; पुतण्याचे प्राण वाचवताना काकाचा मृत्यू

मालवण : महेश कदम
       मालवण देवबाग समुद्रात आंघोळ करताना बुडत असलेल्या पुतण्याला वाचविण्यासाठी गेलेल्या रावजी अवधूत चोपडेकर वय 60 रा.चोपडेकरवाडी यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी 12, वाजण्याच्या सुमारास घडली. यात त्यांचा पुतण्या दर्श चोपडेकर याला रावजी यांनी पाण्यातून बाहेर काढत त्याला जीवदान दिले आणि काही अवधीतच त्यांचा बुडून मृत्यू झाला या दुर्दैवी घेटनेमूळे देवाबाग गाव शोकाकुल झाला आहे.
     शुक्रवारी दुपारी 11.30 वाजता रावजी चोपडेकर आणि त्यांच्या घरातील पुतणे दर्श असे तीन ते चार जण देवबाग सिद्देश्वर मंदिर समोरील समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले होते. यावेळी रावजी यांना गरीने मासे पकडण्याचा छंद असल्यामुळे ते देवबाग समुद्रात मासे पकडत होते. याचवेळी समुद्रातील लाटा उसळलेल्या आणि दर्श हा पाण्यात बुडू लागला असताना आपल्या जीवाची पर्वा नकरता रावजी यांनी दर्श याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली त्याला पाण्यातून बाहेर काढत असताना.समुद्रातील लाटेने त्यांना आपल्या कवेत घेतले…त्यांचे पुतणे आरडाओरडा करत असताना स्थानिक ग्रामस्थ दर्शन बांदेकर नयन कांदळगावकर आणि युवकांनी धाव घेतली. त्यांना मालवण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रावजी चोपडेकर हे पट्टीचे पोहणारे होते त्यांच्या या अकाली मृत्यूने देवबाग वासियांनी हळहळ व्यक्त केली आहे. पर्यटन व्यावसायिक बाबली चोपडेकर व मकरंद चोपडेकर यांचे ते काका होत.

error: Content is protected !!