ठळक घडामोडी

काळसेत नवविवाहितेची आत्महत्या!

मालवण पोलिसांची घटनास्थळी धाव

मालवण : महेश कदम
     मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी येथील एका नवविवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे मालवण तालुक्यात खळबळ पसरली आहे.
    पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, काळसे धनगरवाडी ते भंडारवाडी येथील जाणाऱ्या पायवाटेवरील झाडाला सदर महिलेने ओढणीच्या सहाय्याने गळफास लावला. तिचे लग्न होऊन एक वर्ष झाले होते. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी कट्टा पोलीस व मालवण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी जाऊन पंचनामा केला, पुढील तपास सुरू असल्याची माहीती मालवण पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

error: Content is protected !!