ठळक घडामोडी

तारकर्लीत सुमो गाडी थेट हॉटेलमध्ये घुसली!

कोल्हापूरच्या पर्यटकांची गाडी नियंत्रण सुटल्याने अपघात

पोलिस नावाची पाटी असलेल्या गाडीला अपघात; हेल्पर जखमी, हॉटेलचे नुकसान

मालवण : महेश कदम
     मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या कोल्हापूर येथील पर्यटकांची सुमो गाडी वायरी तारकर्ली येथे असलेल्या हॉटेल “सिंधुदुर्ग रत्न, या हॉटेलात घुसल्याची घटना रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने काही मिनिटांपूर्वीच पर्यटक जेवण आटोपून गेले असताना ही घटना घडली. मात्र टेबल साफ करणाऱ्या हेल्पर रविंद्र आचरेकर यांना किरकोळ दुखापत झाली. यात हॉटेल मालकस्वप्नील मिटकर यांच्या हॉटेलची दर्शनी भिंत. टेबल खुर्च्या यांचे 50 ते 60 हजार रुपये नुकसान झाले आहे.याबाबत मिटकर यांनी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.मालवण तारकर्ली – वायरी रस्त्यावर स्वप्नील मिटकर यांचे सिंधुदुर्ग रत्न हे हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये थेट ‘पोलीस’ नावाची पाटी लावून फिरणाऱ्या कोल्हापूर येथील पर्यटकांची सुमो गाडी घुसली. अन हॉटेल मालक यांच्यासहित सर्वजण हादरले. मिटकर कुटुंबीय आणि कामगारांची तारांबळ उडाली. काही मिनिटांचंपूर्वी दोन पर्यटकांचा ग्रुप जेवण आटोपून गेला होता आणि ही घटना घडली.

error: Content is protected !!