ठळक घडामोडी

लूटमारप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी!

कणकवली : प्रतिनिधी
       ओटव-ओटववाडी आजीच्या लुटमारीप्रकरणी एलसीबीच्या पथकाने नातवाला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी मीरा-भाईंदर येथून शिताफीने बेडया ठोकल्या. साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (२१, रा. वसई) आणि मुकेश महेंद्र पाटणे (२८ रा. विरार) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
        ओटव-ओटववाडी येथील सुवर्णा नारायण रावले (६६) या बुधवार २२ एप्रिल रोजी सकाळी आपल्या घरात काम करत होत्या. त्यावेळी त्यांचा नातू साईल रसाळ याने त्याच्या साथीदारासह घरात प्रवेश केला. दोघांना सुवर्णा यांचे तोंड व डोळे हाताने बंद केले आणि त्यांना ओढत बेडरूम नेले. काही समजण्याच्या आधीच आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चैन हिसकावून घेतल्या आणि त्यांना बेडरूममध्ये कोंडून बाहेरून दरवाजा लावत पळ काढला. याप्रकरणी सुवर्णा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला होता. एलसीबीच्या पथकाने आजीला लुटणाºया नातवाला व त्याचा साथीदाराला मीरा-भाईंदर येथून अटक केली होती.

error: Content is protected !!