ठळक घडामोडी

मालवण शहर स्वच्छतेसाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी घेतला पुढाकार!

सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम; प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबविणार

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित

मालवण : महेश कदम
      मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता समिती सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी मालवण शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्य सभापतींच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सागरी महामार्गावर देऊळवाडा ते हॉटेल रामेश्वर या परिसरात शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत आरोग्य विभाग कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच कार्यांलयीन अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. 
       यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य व स्वच्छता निरीक्षक संजय पवार, मंदार केळुस्कर, आनंद वळंजू, प्रतीक मालवणकर, पवन धुरी, शिवाजी जाधव यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते. सागरी महामार्ग खूपच कचऱ्याने भरलेला आहे. यासाठी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. इथून पुढे प्रत्येक महिन्यात प्रत्येक प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाने त्या त्या प्रभागातही स्वच्छता मोहीम राबविणार आहोत. शहरातील सर्व दहाही प्रभागात एका महिन्यात एक प्रभाग एक दिवस आमची पूर्ण टीम स्वच्छता मोहिमेत सहभागी असेल. हा उपक्रम वर्षभर चालू राहील. यासाठी सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार असल्याचे आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी सांगितले..

error: Content is protected !!