पावशी मिटक्याचीवाडी येथील घटना
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पावशी – मिटक्याचीवाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८ मे) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान सखाराम मयेकर (रा. पावशी मिटक्याची वाडी) यांनी कुडाळ पोलिसात दिली. अमित हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या निधनामुळे पेडणेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमित हा त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे गावात सर्वांचा परिचित होता. त्याच्या या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.








