उद्यान महाविद्यालय मुळदेच्या विद्यार्थीनी सहा महिने तेंडोलीत करणार शेती अभ्यास
आधुनिक बागायती व सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन; तेंडोलीत विद्यार्थिनींचा उपक्रम यशस्वी

कुडाळ : प्रतिनिधी
उद्यान महाविद्यालय (मुळदे) च्या विद्यार्थीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तेंडोली गावात दाखल झाल्या असुन पुढील सहा महिने त्या गावात वास्तव्य करुन शेती व ग्रामीण जिवनाचा अभ्यास करणार आहेत.उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शनिवारी तेंडोली येथील ग्रामपंचायतीला भेट दिली.सरपंच अॅड.अनघा तेंडोलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंच अॅड. अनघा तेंडोलकर यांच्याकडे सुपूर्द केले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी गावातील शेती पद्धती, बागायती पिके, महिला बचत गट तसेच ग्रामविकास योजनांची माहिती घेतली. ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून ग्रामीण भागातील विकासकामांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी संवाद साधत आधुनिक बागायती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धन याविषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. ग्रामीण नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. या उपक्रमासाठी सृष्टी पेंडुरकर, नेहा प्रभुतेंडोलकर, निकिता प्रभुतेंडोलकर, सिद्धी चौधरी, पूर्वा मुरकर, तन्मयी भगत, प्रतिक्षा सुर्वे,पल्लवी दाभोळकर, या विद्यार्थिनींचा सहभाग असून ते पुढील सहा महिन्याच्या कालावधीत गावातील शेती पद्धती, पिक व्यवस्थापन, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच कृषि विकासाच्या विविध बाबींचा अभ्यास करणार आहेत. तेंडोली गावातील शेतकऱ्यांनी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच अँड अनघा तेंडोलकर यांनी केले.









