ठळक घडामोडी

कणकवली : प्रतिनिधी
     कणकवली तालुक्यातील डामरे-वरचीवाडी येथील भिकाजी सावंत यांच्या घराला रविवारी मध्यरात्री १ वाजता लागलेल्या आगीत १ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून घरातील सर्व साहित्य फ्रीज, कपाट, टीव्ही, सर्व कपडे, लाईट फिटिंग, घरातील धान्य, घरातील भांडी जळून खाक झाले. आगीमुळे अंदाजे १,८५,००० रु. चे नुकसान झालेले आहे. या दुर्घटनेमुळे सावंत कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महसूल विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी केली आहे.

error: Content is protected !!