श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी केली निवड जाहीर
जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नांवर कुडाळात बैठकीत चर्चा
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगारांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भेडसावत असलेली अडचण म्हणजे काही गावांमध्ये दाखल्यांवर ग्राम पंचायत अधिकारी सही देत नाहीत. तसेच शिष्यवृत्ती सारखे लाभ अजूनही प्रलंबित आहेत. त्या बद्दल कामगार वर्गाने आपल्या अडिअडचणी व्यक्त केल्यात. त्यावर श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी सदर प्रश्नी कामगारांची गावात बैठक लावा, आपण तेथे येऊन चर्चेतून तोडगा काढला जाईल तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व आमदार यांचे लक्ष वेधून सदर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे सांगीतले. कामगार वर्गाची शिष्यवृत्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कामगार यांच्या खात्यात पैसे लवकरच जमा होणार आहेत, अशी माहितीही अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी यावेळी दिली.
श्रमिक कामगार ही संघटना तळागाळातील कामगार वर्गासाठी काम करत आहे. त्या अनुषगाने श्रमिक कामगार संघटना सर्व कामगार वर्गाकडे पोहोचावी कामगार यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी म्हणून सभेमध्ये जिल्हा व तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी आत्माराम साटेलकर सचिव पदी श्री. नामदेव जानकर, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बळी, महिला जिल्हा अध्यक्ष अंतरा गावडे जिल्हा सचिव पदी संजना पाटकर कुडाळ तालुका अध्यक्ष पदी दत्ताराम वारंग, कुडाळ तालुका सचिव रविंद्र गुरव, दोडामार्ग तालुका अध्यक्ष भैरु पाटील, मालवण तालुका अध्यक्ष – दीपक देऊलकर, कुडाळ महिला तालुका अध्यक्ष रसिका कदम, कुडाळ उपाध्यक्ष योगेश घावनळकर, कविलकट्टा प्रभाग अध्यक्ष प्राची पावसकर, बांबुळी प्रभाग अध्यक्ष पदी दिपश्री परब, कुडाळ उपाध्यक्ष शंकर पालकर,
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या सर्वांना श्रमिक कामगार संघटना प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी नियुक्ती करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या सभेला कामगार रसिका चव्हाण, आरती सावंत, रश्मी भरणकर, आत्माराम सावंत, भरत परब, यशवंत जळवी, राजन ताम्हणकर, प्रकाश सावंत, रामदास नाईक उपस्थित होते.
.यावेळी नूतन जिल्हा अध्यक्ष आत्माराम साटेलकर व अंतरा गावडे यांनी कामगार यांच्या प्रश्नांसाठी मी व आपली संपूर्ण श्रमिक संघटना सदैव आपल्या पाठीशी आहे आपण सर्वजण असेच एकत्र होऊन काम करुया आज आपण एकत्र झालोत लवकरच येणाऱ्या काळात संघटना भक्कम पने बांधणी करून तळागाळातील कामगार वर्ग एकत्र करूया. व आपली संघटना भक्कम करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया व कामगार वर्गाला येणाऱ्या अडिअडचणी यांना आपण सर्वजण मिळून तोंड देऊ व प्रश्न सोडवू असे सांगितले.









