ठळक घडामोडी

मालवण देवबाग येथे रस्ता कामावरून वाद!

सुपरवायझरला धक्काबुक्की; घटनेने खळबळ

मालवण : महेश कदम
       मालवण देवबाग येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावरून वादंग निर्माण होत, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून या कामाच्या ठिकाणी असलेल्या सुपरवायझरला धक्काबुक्की झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजता देवबाग विठ्ठल मंदिर परिसरात घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या घटनेत संबंधित सुपरवायझरला दुखापत झाली आहे. त्याच्यावर मालवण ग्रामीणरुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहीती मिळाली आहे.

error: Content is protected !!