श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सवाचे निमित्त
रेकॉर्ड डान्स, दशावतारी नाटक, भजनांचे आकर्षण
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील मधली कुंभारवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदिर देवस्थान येथे मंगळवार दि. १४ व बुधवार दि.१५ एप्रिल २०२६ रोजी श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
मंगळवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स कार्यक्रम होणार असून, रात्री ७ वाजता श्री देव विश्वकर्मा दशावतार नाट्य मंडळ नेरूर सुतारवाडी यांचा नाटयप्रयोग- “नरसिंह तेजहरण” सादर करण्यात येणार आहे.
बुधवार, १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर सकाळी ११ वाजता श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी सोहळा व दीपप्रज्वलन पार पडेल. दुपारी १ वाजता तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता श्री ब्राह्मणदेव प्रा.भजन मंडळ (मधली कुंभारवाडी)चे भजन, ५ वाजता श्री सदगुरू संगीत भजन मंडळ कुडाळचे भजन, ६ वाजता श्री सद्गुरू संगीत वारकरी दिंडी भजन मंडळ कुडाळचे वारकरी दिंडी भजनही होणार आहे. रात्री ८ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ (चेंदवण)चा “सूर्यग्रहण” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने मधली कुंभारवाडी मित्रमंडळ (सुपरस्टार) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.









