पादचारी महामार्ग ओलांडताना अपघात; पादचारी डंपरला आदळला
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी कुंभारवाडी येथे भरधाव डंपरची पादचारी नागरिकाला धडक बसली. सदर नागरिक महामार्ग ओलांडत असताना, तो डंपरला आदळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास झाला. घटनास्थळी नागरिक व वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती.









