ठळक घडामोडी

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा  उमेदवारी अर्ज दाखल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी
       महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र  चव्हाण, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, महसूल  श्री. चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री  श्री. जयकुमार गोरे, आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
     उमेदवारी भरण्यापूर्वी प्रमोद जठार यांची घेतली खा.नारायण राणेंची भेट
      भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभाशीर्वाद घेतले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले.

error: Content is protected !!