वनविभागाकडून रेस्कू; नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले
कुडाळ : प्रतिनिधी
अणाव बामणवाडी मधील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले.अणावकर याची माहिती वनपाल- कसाल यांना दिली. त्यानंतर वन क्षेत्रपाल कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागातील कर्मचारी प्रकाश शिंदे, प्रियांका पाटील, वनरक्षक कसाल ऊत्तम कांबळे, पंकज घाडी, ऊदय परब, प्रशांत जाधव, प्रवीण पवार, बाबुराव कांबळे, सुनिल आंगणे यांनी घटनास्थळी धाव घेत त्या खवले मांजराला जेरबंद केले. त्यांना अणाव बामणवाडीमधील ग्रामस्थ अजित अणावकर, राजन जडये, विपुल हडकर, पार्थ अणावकर यांनी मदत केली. वैद्यकीय तपासणीनंतर खवलेमांजरास परिक्षेत्र अधिकारी कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.









