ठळक घडामोडी

डिगस श्री काळंबा देवीच्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन!

२९ एप्रिल पासून १ मे पर्यंत भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल

धार्मिक कार्यक्रम, समई नृत्‍य स्पर्धा, एकांकिका, नाटकासह शिमगोत्‍सव कार्यक्रम

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ तालुक्यातील डिगस येथील श्री काळंबा (कालिका) देवीचा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. २९ एप्रिल ते शुक्रवार दि. १ मे २०२६ या कालावधीत भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
        बुधवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. श्री देवीची विधिवत पूजा, ८ वा. श्री देवीची पालखी, तरंग सजविणे, ९ वा. श्री देव लिंग काळंबा (कालिका) देवी पंचायतन अभिषेक, दुपारी ३ वा. स्थानिक भजने, सायं. ५.३० वा. हरिपाठ व आरती, रात्री ७ वा. समई नृत्‍य, रात्री ८ वा. जिल्हास्तरीय समई नृत्‍य स्पर्धा. प्रथम क्रमांकास ५००० रु., द्वितीय क्रमांकास ३००० रु.  व तृतीय क्रमांकास २००० रु. अशी पारितोषिक देण्यात येणार आहेत.
      गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वा. श्री देवीची विधिवत पूजा, ८ वा. होम हवन, दुपारी १२ वा. आरती, १ वा. महाप्रसाद, ३ वा. स्थानिक भजने, सायं. ४ वा. किर्तन – ह.भ.प. गोविंद आसोलकर, ६ वा. हरिपाठ व आरती, रात्री ७.३० वा. दोन अंकी एकांकिका – शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक, ११ वा. दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळ, सिंधुदुर्ग यांचा नाटयप्रयोग – स्वामी अन्नपूर्णा.
     शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी ७ वा. श्री देवीची विधिवत पूजा, ९ वा. श्री सत्‍यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती व तिर्थप्रसाद, १ वा महाप्रसाद, ३ वा. स्थानिक भजने, सायं. ६ वा. हरिपाठ व आरती, रात्री ८ वा. कोकणची लोकसंस्कृती शिमगोत्‍सव कार्यक्रम-सादरकर्ते दिनू मेस्त्री ग्रुप नेरूर, १० वा. पालखी सोहळा, १२ वा. अमृतनाथ दशावतार नाटय मंडळ, म्हापण-वेंगुर्ला यांचा नाटयप्रयोग – पंढरीचा पहिला वारकरी आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती, गावकर व डिगस ग्रामस्थ यांनी केले आहे.

error: Content is protected !!