खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला मदतीचा हात
अणाव मधील आनंदाश्रयात जीवनावश्यक साहित्य वाटप
कुडाळ : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना (शिंदे गट) कुडाळ-मालवण तर्फे जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा सचिव राहुल बागवे, कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर, मालवण तालुकाप्रमुख अभी लाड, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, उपतालुकाप्रमुख मंदार पडवळ, तालुका चिटणीस अमित चव्हाण, तालुका सचिव साई दळवी, विभागप्रमुख धनंजय परब, नेरुर उपविभाग प्रमुख प्रसाद मठकर, विभागप्रमुख गीतेश खेडेकर व योगेश कामतेकर आदी उपस्थित होते.









