सचिवपदी सतीश माडये; तालुका कार्यकारिणी एकमताने जाहीर
उपाध्यक्षपदी संतोष म्हाडगुत व नीलेश गुरव तर खजिनदारपदी वैभव धुरी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुका पोलीस पाटील गाव कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत धुरी (वाडीवरवडे) यांची तर सचिवपदी सतीश माडये (पिंगुळी) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तालुक्याची उर्वरित कार्यकारिणीही निवडण्यात आली.
कुडाळ तालुका पोलीस पाटील यांची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यात सर्वानुमते एकमताने तालुका कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. यात अध्यक्ष प्रशांत धुरी, सचिव सतीश माडये यांच्यासह उपाध्यक्ष संतोष म्हाडगुत (आंबेरी) व नीलेश गुरव (सोनवडे), खजिनदार वैभव धुरी (धुरींटेंबनगर – पिंगुळी), सहसचिव आदिती देसाई (तळीगाव), जिल्हा प्रतिनिधी राजेश जानकर (किर्लोस), सल्लागार देऊ सावंत (पणदूर), सदस्य सौ.सदफ मुश्ताक खुल्ली, अमित मराठे, रमाकांत जाधव, पूनम तेरसे, शेखर शेलटे, गंगाराम पारकर, दीपा कुबल, शमिका हरमलकर, सरोज काजरेकर, राजन शिंदे, सुरेश नाईक, सुवर्णा म्हाडदळकर, दिलीप वराडकर, हेमंत वारंग, अनंत कुडाळकर व रणजित परब यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष प्रशांत धुरी म्हणाले, तालुक्यातील आपण सर्व सहकाऱ्यांनी आपल्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकून विश्वास दाखविला आहात. तालुका पदाधिकाऱ्यांसह कार्यकारिणीला सोबत घेऊन सर्वांच्या विचाराने आपले जे प्रश्न असतील ते मार्गी लागण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन.









